नमस्कार, आपल्याला कळविण्यात आनंद होतो की, महाराष्ट्र मध्ये प्रथमच शिखर शिंगणापुर मध्ये महाशिवरात्रि उत्सवाच्या पर्वकाळात एक कोटी लिंगार्चन व अन्नदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 या पाच दिवसांमध्ये एक कोटी शिवलिंगाची पूजा व एक लाख शिवभक्तांना अन्नदान केले जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त शिवभक्तांनी सहभागी होऊन पूजेचा व अन्न दानाचा लाभ घ्यावा.
"तिर्थक्षेत्र फाउंडेशन " या संस्थेच्या नावामधेच सर्व काही आहे. तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्थापन झालेली संस्था व विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांचा मुळपाया म्हणजेच तिर्थक्षेत्र फौंडेशन होय. आपल्याला या संस्थेच्या नावातच याचे ध्येय, धोरण व उद्देश पहायला मिळत आहे. या संस्थेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश हा धार्मिक, सांस्कृतिक व समाजिक विषयांचा विचार करणे हा आहे. तसेच या संस्थेची स्थापना हि कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली आहे. कोटीलिंगार्चन हा कार्यक्रम भारतातील पहिला असा कार्यक्रम आहे की, कोटी शिवलिंगाची पुजा एकाच वेळी करता येणार आहे. तसेच सलग पाच दिवस रोज एक लाख भक्तांना अन्नदान करण्यात येणार आहे. याच प्रमाने पुढील काळात गोसेवा, अन्नछत्र, वेदपाठशाळा, मोफत आरोग्य शिबिरे इ. सामाजिक उपक्रम करण्याची योजना आहे. सांगायला आनंद होतो की, अल्पावधीतच या संस्थेला समाजात मानाचे स्थान मिळाले आहे. तरी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपणा सर्वांना या संस्थेला तन, मन, धनाने जोडले जावे हि विनंती करतो.
अन्नदान हे सर्व श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले गेले आहे.दान एक असे कार्य आहे, ज्याद्वारे आपण केवळ धर्माचे योग्य पालन करू शकत नाही तर आपल्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. वय, संरक्षण आणि आरोग्यासाठी दान अतुलनीय मानले जाते. जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दानाचेही विशेष महत्त्व आहे. दान केल्याने ग्रहांच्या दुःखातून मुक्ती मिळणे सोपे होते.
जो मनुष्य नित्य अन्नदान करतो, त्याला संसाराचे पूर्ण फळ मिळते. एखाद्याच्या क्षमतेनुसार आणि सोयीनुसार एखाद्याने काही अन्नदान केले पाहिजे. यामुळे परम कल्याण होते.
तीर्थक्षेत्र फौंडेशन आयोजित १ कोटी लिंगार्चन सोहळा व लक्ष भोजन येत्या वर्षी दि.१६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ संपन्न होत आहे.
कोटी लिंगार्चन हे जन्मस्थळ, काळ, परिस्थीती यांच्या निवडीचे स्वातंत्र्य आपल्याल परमेश्वराने दिलेले नाही. प्रत्येक जीव हा त्याच्या पूर्वसंचितानुसार
अनुकुल किंवा प्रतिकुल परिस्थीती अनुभवत असतो. जीवनात अनुकुलता, सहजता असेलच तर ती सदैव टिकून रहावी किंवा त्यात वृद्धि
व्हावी आणि प्रतिकुलता, विवंचना (शारीरीक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक) असल्यास त्या संकटातून संकट विमोचनाकरिता वेद, पुराणे उपनिषदे, इत्यादींच्या माध्यमातून धर्म शास्त्रान ऐ प्राचीन काळापासून सृष्टिच्या सुरवातीपासुन शिवोपासना" योजलेली आहे. त्यामध्ये सर्वोत्तम विधी कोहिलिंगार्चन.
महाराष्ट्र हा संतानी, पराक्रमी पुरुषांनी आणि देवी-देवतांच्या वरदहस्तानी फुललेला संपन्न प्रदेश आहे. महाराष्ट्रातील असंख्य धार्मिक स्थळे खूप प्राचीन, स्वयंभू आणि जागृत असूनही महाराष्ट्राच्या नकाशावर अनभिज्ञ आहेत. यातीलच एक धार्मिक ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर.
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे.शिखर शिंगणापूर येथून दहा मिनिटांच्या अंतरावर गुप्तलिंग हे देवस्थान आहे.
शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी. शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती तेल्याभुत्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणं हे तसं कष्टाचं काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचं त्यालाच मदतीला बोलावतात आणि हाकही... हक्काचं माणूस असावं तशी म्हणजे, `हे म्हादया, धाव, मला सांभाळ` अशी. असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक केला जातो.
Bank Name - Bank Of Maharashtra
Account Name. - Tirthkshetra Foundation
Account Number. - 60427741709
IFSC No. - MAHB0000824
80G AVAILABLE AS PER INCOME TAX AT 1961 AND RULES MADE THEREUNDER.
Income Tax Exemption (80-G) Number